सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ४९ लाखांहून अधिक रुपयांची हानी !

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे आतापर्यंत खासगी आणि सार्वजनिक संपत्तीची एकूण ४९ लाख ६२ सहस्र ८६० रुपयांची हानी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

१ जूनपासून जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे १५२ घरे, २३ गोठे आणि १३ अन्य संपत्ती यांची हानी झाली आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील २, कुडाळ तालुक्यातील १ आणि देवगड तालुक्यातील ३, अशी एकूण ६ घरे पूर्णत: पडली आहेत. १२७ पक्क्या घरांची ३३ लाख ८० सहस्र ११० रुपये, २५ कच्च्या घरांची ४ लाख ९० सहस्र, २३ गोठ्यांची ५ लाख ६९ सहस्र ६५० रुपये इतकी हानी झाली आहे. तसेच दुकाने, टपर्‍या (स्टॉल) आदी १३ मालमत्तांची ५ लाख २३ सहस्र १०० रुपयांची हानी झाली आहे.