सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून चाकूने प्राणघातक आक्रमण

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील चिलकाना मार्गावरील एका शाळेजवळ धर्मांधांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत सैनी यांच्यावर चाकून वार केले. यात सैनी गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ‘या आक्रमणामागे कोणते कारण आहे ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

‘हिंदु कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा देशव्यापी कट आहे का ?’ याचा आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. जर असे असेल, तर ‘धर्मयुद्धाला प्रारंभ झाला आहे’, असेच म्हणावे लागेल. यापासून रक्षण होण्यासाठी हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही !