अलाप्पुळा येथील वालियाकलवूर मंदिरातील छत पडून ३ भाविक घायाळ झाल्यावरून मंदिर व्यवस्थापनावर ताशेरे

  • केरळ उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका प्रविष्ट करून घेतली !

  • त्रावणकोर देवस्वम बोर्डाच्या अंतर्गत येते मंदिर !

केरळ उच्च न्यायाल

थिरूवनंतपूरम् – केरळ उच्च न्यायालयाने अलाप्पुळा येथील वालियाकलवूर मंदिरातील छत पडून ३ भाविक घायाळ झाल्याच्या घटनेचे प्रकरण स्वतःहून प्रविष्ट करून घेतले. त्रावणकोर देवस्वम बोर्डाच्या अंतर्गत हे मंदिर येत असल्याने न्यायालयाने बोर्ड, तसेच मंदिर व्यवस्थापन यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. ‘अशा प्रकारे मंदिरांच्या बांधकामातील त्रुटी बोर्डाच्या अंतर्गत येणार्‍या अन्य मंदिरांमध्ये आहेत का ?’, याची निश्‍चिती करण्याचा आदेशही दिला आहे. जर कुठे त्रुटी आढळल्या, तर भाविकांच्या सुरक्षेसाठी त्या भागाचा उपयोग करण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

‘मंदिरात ५ मासांच्या बाळाचा एक धार्मिक विधी चालू असतांना तेथील छत कोसळल्याने त्याची आई आणि अन्य दोघे घायाळ झाले’, असे वृत्त येथील ‘दैनिक मातृभूमी’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याचा संदर्भ देत न्यायालयाने हे प्रकरण स्वत:हून प्रविष्ट करून घेतले. बोर्डाने न्यायालयात सांगितले की, सदर छताचे बांधकाम करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !