३२ जणांच्या निर्दोषत्वावरील आव्हान याचिकेवर १ ऑगस्टला सुनावणी  

बाबरी विध्वंस प्रकरण

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील बाबरी ढाच्याच्या विध्वंसाच्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सप्टेंबर २०२० मध्ये ३२ जणांना निर्दोष घोषित केले होते. या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे. अयोध्येतील हाजी महमूद अहमद आणि सैयद अखलाक अहमद यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

३२ आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, बृजभूषण शरण सिंह, उमा भारती, साध्वी ऋतंभरा आदींचा समावेश आहे.