हसनपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी भूमीवरील अवैध मदरसा प्रशासनाने पाडला !

अमरोही (उत्तरप्रदेश) – हसनपूर तालुक्यातील जेबडा गावात सरकारी जागेवर अवैधरित्या बांधलेला मदरसा प्रशासनाने बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केला. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. या सरकारी भूमीवर काही लोकांनी प्रथम नमाजपठण करणे चालू केले. त्यानंतर येथे मशीद आणि नंतर मदरसा बांधण्यात आला. मुसलमानांनी ही जागा जनावरे पाळण्यासाठी घेतली होती. त्या वेळी ‘या जागेवर आम्ही जनावरांसाठी चारा ठेवणार आहोत’, असे ग्रामस्थांना लिखित स्वरूपात आश्‍वासन देण्यात आले होते; मात्र नंतर या जागेवर धार्मिक कारवायांना आरंभ झाल्यावर ग्रामस्थांनी त्याला विरोध केला.

अमरोहा जिल्ह्यात जे मदरसे ‘मदरसा आधुनिकीकरण’ योजनेचा लाभ घेत आहेत, अशा अंदाजे २०८ मदरशांची चौकशी करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

सरकारी भूमीवर अवैधरित्या मदरसा बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?