|
पाटलीपुत्र (बिहार) – ‘मार्शल आर्ट’ कराटेचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध राज्यांतील मुसलमान युवकांना पिस्तूल, तलवारी आणि चाकू ही शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणार्या दोघा धर्मांध मुसलमानांना बिहार पोलिसांनी अटक केली. महंमद जलालुद्दीन आणि अथर परवेझ अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांचा वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा कट होता, अशी माहिती पाटलीपुत्रचे साहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनीष कुमार पुढे म्हणाले,
१. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पाटलीपुत्र पोलिसांनी फुलवारी शरीफच्या नया टोला येथील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.) कार्यालयावर धाड टाकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याच कार्यालयात शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
२. महंमद जलालुद्दीन हा झारखंड पोलीस दलातील निवृत्त अधिकारी आहे, तर अथर परवेझ हा बंदी असलेल्या ‘सिमी’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेवर बंदी घातल्यानंतर तो पी.एफ्.आय. या जिहादी विचारसरणी जोपासणार्या संघटनेत सहभागी झाला. यासह तो ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) या संघटनेसाठीही काम करत होता. वर्ष २००१ मध्ये ‘सिमी’वर बंदी घातल्यानंतर परवेझचा धाकटा भाऊ बिहारमधील एका बाँबस्फोटाच्या प्रकरणात कारागृहात गेला होता.
सौजन्य : TIMES NOW
३. गेल्या दोन मासांपासून आरोपींकडे इतर राज्यांतील लोक येत होते. हे लोक तिकीट आरक्षित करतांना, तसेच हॉटेलमध्ये रहातांना त्यांची नावे पालटत होते.
४. अटकेतील दोन्ही आतंकवाद्यांना पाकिस्तान आणि बांगलादेश येथून हवालाद्वारे पैसा पुरवला जात होता. यासह भारतातील केरळ, बंगाल आणि उत्तरप्रदेश या राज्यांतूनही या दोघांना पैसे पाठवले जात होते.
५. दोन्ही आतंकवाद्यांनी फुलवारी शरीफ येथील नवीन टोला अहमद पॅलेसला प्रशिक्षण केंद्र बनवले होते. ते येथे ‘शस्त्रांचा वापर कसा करायचा ?’ हे शिकवण्यासह ‘भारतातील मुसलमानांची कथित दुर्दशा’, ‘मोदी सरकारकडून होणारे कथित अत्याचार’ आदी कथा सांगून तरुणांचा बुद्धीभेद करत होते. अटक करण्यात आलेल्या दोघा आतंकवाद्यांकडून ८ पानी ‘व्हिजन पेपर’ मिळाला असून त्यामध्ये लिहिले आहे की, ‘पी.एफ्.आय.ला पूर्ण निश्चिती आहे की, जर केवळ १० टक्के मुसलमान पी.एफ्.आय.च्या मागे एकवटले, तरी ते भ्याड बहुसंख्य समुदायाला गुडघे टेकायला लावतील आणि मुसलमानांना पुनर्वैभव मिळेल. आतंकवाद्यांनी या ‘पेपर’ला ‘इंडिया व्हिजन २०४७’ असे नाव दिले आहे. वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याच्या उद्देशाने ते काम करत होते.
#WATCH | An excerpt from 8-page long document they shared amongst themselves titled ‘India vision 2047’ says, ‘PFI confident that even if 10% of total Muslim population rally behind it, PFI would subjugate coward majority community & bring back the glory’: Bihar SSP Manish Kumar pic.twitter.com/MIId3qUXZE
— ANI (@ANI) July 13, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आतंकवादी आक्रमणाचा होता कट !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आतंकवादी आक्रमण करण्याचा कट महंमद जलालुद्दीन आणि अथर परवेझ या दोघांनी रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या १२ जुलै २०२२ या दिवशीच्या बिहार दौर्यात त्यांना लक्ष्य करण्याच्या कटाचाही समावेश होता. त्यांनी ६ आणि ७ जुलैला पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचण्यासाठी बैठक घेतली. याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी ११ जुलैला फुलवारी शरिफ येथे धाड टाकली. |
संपादकीय भूमिका
|