(म्हणे) ‘एखादी व्यक्ती १ सहस्र वर्षे जरी जगली, तरी ती ३३३ कोटी देवतांना प्रसन्न करू शकणार नाही !’

अजमेर दर्ग्याच्या अंजुमन कमेटीच्या सचिवांच्या मुलाचे हिंदुद्वेषी विधान

आदिल चिश्ती

जयपूर – अजमेर दर्गाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि सेवेकरी (खादिम) यांनी मागील काही दिवस भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात चिथावणीखोर टिप्पण्या केल्या होत्या. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून गेले होते. आता या दर्ग्याचा कारभार चालवणारे अंजुमन कमेटीचे सचिव सरवर चिश्ती यांचा मुलगा आदिल चिश्ती याने हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवली आहे. आदिल चिश्ती याने व्हिडिओ जारी करून हिंदूंच्या देवतांवर आक्षपार्ह टिप्पणी केेली. सरवर चिश्ती याने काही दिवसांपूर्वी हिंदु व्यापार्‍यांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन मुसलमानांना केले होते. दर्ग्याचा आणखी एक सेवेकरी गौर चिश्ती याने पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची चिथावणी दिली होती. आदिल चिश्ती याने २३ जून २०२२ या दिवशी हा व्हिडिओ प्रसारित केला होता.

आदिल चिश्ती याने केलेली वक्तव्ये  

१. नूपुर शर्मा हिंदू असतील, तर मला त्यांना काही प्रश्‍न विचारायचे आहेत. ३३३ कोटी देवतांचे अस्तित्व कसे मानता येणार ? हे तार्किक आहे का ? ‘एकच ईश्‍वर असणे’, हे आम्ही समजू शकतो. विभिन्न धर्मांमध्ये ईश्‍वराची वेगवेगळी असलेली व्याख्या आम्ही समजू शकतो; मात्र ३३३ कोटी ‘घाऊक देवता’ (Wholesale of Gods) कसे ? एखाद्या व्यक्तीला १ सहस्र वर्षांचे जरी आयुष्य मिळाले, तरी तो ३३३ कोटी देवतांना प्रसन्न करू शकणार नाही ? (हिंदु धर्मात ३३३ कोटी देवतांचा नव्हे, तर ३३ कोटी देवतांचा उल्लेख आहे. प्रगत वैद्यकशास्त्रात जसे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्रतज्ञ आदी विविध तज्ञ आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक देवतांचे वैशिष्ट्य असून विविध अडचणींवर संबंधित उपास्य देवतेची पूजा केल्यास फळ मिळते. त्यामुळे एवढ्या देवता असणे, ही हेटाळणी करण्याची गोष्ट नसून ते हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे, हे आदिल चिश्ती याने जाणावे ! – संपादक)

२. नुपुर शर्मा यंना विचारू इच्छितो की, हिंदूंच्या पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णचे १० अवतार असल्याचे सांगितले जाते. यांतील काही अवतार हे मानवाप्रमाणे आहेत, तर काही अवतार हे प्राण्यांप्रमाणे आहे, तर काही हे मानव आणि पशू यांचे शरीर मिळून बनले आहेत. (प्रत्येक देवता ही तत्त्व आहेत. ‘कोणत्या स्वरूपात प्रकट झाल्यामुळे भक्ताचा उद्धार होईल’, हे भगवंताला ज्ञात असते. त्यामुळे तो त्या त्या रूपात प्रकट झाला आहे. एकेश्‍वरवाद्यांनी असले प्रश्‍न विचारत बसण्याऐवजी त्यांना पूजल्यास त्यांनाही तशी अनुभूती येईल ! – संपादक) अशा प्रकारे ईश्‍वराने १० अवतार घेणे शक्य आहे का ? (‘जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजेल, त्या वेळी मी अवतार घेईन’, असे गीतेत भगवान कृष्णाने भक्ताला दिलेले वचन आहे. जसे मुसलमानांसाठी कुराणातील प्रत्येक वाक्य हे सत्य आहे, त्याप्रमाणे श्रद्धाळू हिंदूंसाठी भगवंताचे वचन हे ब्रह्मवाक्य आहे ! त्यामुळे ‘ईश्‍वर अवतार घेतो’, यावर हिंदूंची अढळ श्रद्धा आहे ! – संपादक)

३. आदिल याने ‘हनुमान आणि श्री गणेश यांचे  अस्तित्व तुम्ही कसे सिद्ध करू शकता ? हे दोन्ही देव पूर्ण मनुष्यरूपात नाहीत’, असेही म्हटले आहे.

आदिल चिश्ती याच्याकडून घुमजाव

आदिल चिश्ती याला विरोध होऊ लागल्यावर त्याने घुमजाव केला असून, ‘माझ्या वक्तव्यांमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागतो; मात्र अनेक वृत्तवाहिन्यांनी माझा व्हिडिओ संपादित करून प्रसारित केला’, असे म्हटले आहे. (प्रकरण अंगलट आल्यावर घुमजाव करणार्‍या चिश्तीला शिक्षा होईपर्यंत हिंदूंनी या प्रकरणाचा प्रशासनाकडे पाठपुरावा घ्यावा ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • हिंदु धर्म ‘चराचरांत ईश्‍वर आहे’, असे शिकवतो. त्यामुळे पशू, पक्षी आणि झाडे यांच्यातही देव पहातो; मात्र एकेश्‍वरवाद्यांना हे कसे कळणार ? हिंदु धर्मानुसार आचरण करून अनुभूती न घेणार्‍या मुसलमानांना हिंदूंच्या देवतांविषयी बोलण्याचा काय अधिकार ?
  • मुसलमानांच्या श्रद्धास्थानांविषयी असे काही भाष्य हिंदूंनी केले असते, तर एव्हाना हिंदूंच्या विरोधात फतवे काढले गेले असते. हिंदु सहिष्णु असल्याचा अपलाभ बहुतांश मुसलमानांकडून घेतला जातो. अशांना कारागृहांत डांबण्यासाठी कायदा बनवणे आवश्यक !