१. समाजातील व्यक्तींना गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण देण्याची सेवा मिळणे
१ अ. गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण देण्याची सेवा मिळाल्यावर ‘ही सेवा जमेल का ?’, असा मनात विचार येणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करून पहिल्या व्यक्तीशी बोलतांना ‘ती व्यक्ती परिचयाची आहे’, असे वाटणे : मला श्री. राजन केशरी यांच्या माध्यमातून १०० व्यक्तींना गुरुपौर्णिमेचे निमंत्रण देण्याची सेवा मिळाली. ही सेवा करण्याच्या आधी ‘मी ज्या व्यक्तींना ओळखतही नाही किंवा ज्या व्यक्तींना कधी भेटलो नाही, त्यांच्याशी मी कसा बोलू शकेन ?’, असे मला वाटले. त्या वेळी मी प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण केले. मी पहिल्या व्यक्तीला निमंत्रण देण्यासाठी तिच्याशी बोलत असतांना ‘मी त्यांना पूर्वी भेटलो आहे. ते माझ्या परिचयाचे आहेत’, असे मला वाटले. मी संध्याकाळपर्यंत केवळ ३० व्यक्तींना गुरुपौर्णिमेचे निमंत्रण देऊ शकलो. तेव्हा माझ्या मनात ‘वेळ अल्प आहे आणि मला अजून ७० व्यक्तींना निमंत्रण द्यायचे आहे. माझी सेवा अर्धवट राहिल्यास तेवढे लोक गुरुपूजन सोहळा बघण्यापासून वंचित रहातील’, असा विचार आला.
१ आ. सेवा पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करणे आणि सेवा पूर्ण झाल्यावर आनंद मिळणे : माझा संपूर्ण दिवस शेतीच्या कामात गेला. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मला या सेवेपासून वंचित करू नका’, अशी प्रार्थना करत होतो. मी रात्री ८ वाजता शेतातून घरी आलो. मी ‘जोपर्यंत या सर्व लोकांना निमंत्रण देत नाही, तोपर्यंत भोजन करणार नाही’, असा निश्चयही केला. त्या सर्वांना निमंत्रण देण्याची सेवा रात्री १० वाजता पूर्ण झाली. काही जणांनी मला धन्यवादही दिले. काही जण विषय जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. निमंत्रण देण्याची सेवा पूर्ण केल्यानंतर मला समाधान वाटले आणि आनंद झाला.
१ इ. मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी माझे महाविद्यालयीन आणि वसतीगृहातील मित्र यांना गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचे निमंत्रण दिले.
२. कुटुंबातील सदस्यांना ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव पहातांना अनेक अडचणी आल्या; मात्र नंतर ते पूर्ण सोहळा पाहू शकले. सर्वांना परात्पर गुरु डॉक्टरांचे तेजस्वी विचार आणि मार्गदर्शन पुष्कळच आवडले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेच्या संदर्भातील केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे जीवनातील कार्य सोपे झाल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे
साधनेच्या संदर्भात वेळोवेळी मिळत असलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्हा सर्वांचा धर्माप्रती विश्वास वाढला आहे. नेहमी धर्मसेवकांकडून योग्य आणि सरळ सोपे मार्गदर्शन देणारे धर्मशिक्षणवर्ग आयोजित केले जातात. त्यामुळे एक स्पष्ट आणि आनंददायक माहिती आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
– श्री. कुलदीप पटेल, आयर, सरैया, वाराणसी. (१८.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |