मुझफ्फरपूर (बिहार) – येथील नीतीश्वर महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. लालन कुमार यांच्या वर्गात गेली २ वर्षे ९ मास एकही विद्यार्थी न आल्यामुळे त्यांनी या कालावधीतील २३ लाख ८२ सहस्र २२८ रुपयांचे संपूर्ण वेतन धनादेशाच्या रूपात महाविद्यालयाला परत केले होते.
…म्हणून मला हा पगार नको, प्राध्यापकाने 24 लाखांचा चेक केला परत; सर्वत्र होतंय भरभरून कौतुकhttps://t.co/A12IoFOEE3
— Lokmat (@lokmat) July 7, 2022
यावर आता त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, मी माझे स्थानांतर करण्यासाठी ६ वेळा आवेदन दिले होते; परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मी दु:खी होतो. मी कुठलाही निर्णय घेण्याच्या स्थितीमध्ये नव्हतो. मी भावनाशील होऊन हा निर्णय घेतला होता. मी केलेली सर्व वक्तव्ये मागे घेतो.