आगरा (उत्तरप्रदेश) – येथे इकरार नावाच्या मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीला तो हिंदु असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला. ९ वर्षे तो या तरुणीची दिशाभूल करत होता. आता त्याचे बिंग फुटल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासह त्याचा भाऊ, वडील आणि बहिणीचा पती यांचेही नाव गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. फसवणूक, मारहाण, कट रचणे, धमकी देणे, धार्मिक भावना दुखावणे आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
इकरार याने त्याचे नाव अमित सांगितले होते. तो मथुरा येथील रहाणार असल्याची खोटी माहिती त्याने दिली होती. या दोघांना दोन मुलेही आहेत. तो पत्नीला आणि या मुलांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न करायचा. त्याने नवरात्रीत दुर्गसप्तशतीचे पुस्तकही फाडले होते. मुलांची सुंता करण्यासाठी काही मुसलमान त्यांच्या घरात आल्यावर अमित मुसलमान असल्याचे उघड झाले.
संपादकीय भूमिकाअशा गुन्ह्यांसाठी सरकारने स्वतंत्र कायदा करून त्यात जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक ! |