लोकांनी पाणी टाकून वाचवले
भोपाळ (मध्यप्रदेश) – घटस्फोट मागणार्या पत्नीला रईस खान याने भररस्त्यात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी पीडित महिला साहाय्यासाठी याचना करत रस्त्यावर धावत होती. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाणी टाकून तिला वाचवले. या घटनेनंतर आरोपी रईस खान घटनास्थळावरून पसार (फरार) झाला. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळमधील मुस्कान हिचा राजस्थानमधील अलीगंज छाबडा येथे रहणारा रईस खान याच्याशी ३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पीडित महिला रईस खान याचा संशयी स्वभाव आणि त्याच्याकडून प्रतिदिन होणारी मारहाण, यांना कंटाळली होती. त्यामुळे मार्च २०२२ मध्ये ती भोपाळला परत आली आणि तिच्या बहिणीसमवेत राहू लागली. तिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी आवेदन केले होते. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचे निमित्त करून रईस याने ५ जुलैला मुस्कान हिला बोलावून घेतले. त्या वेळी रईस याने मुस्कानला त्याच्यासमवेत नांदण्याची बळजोरी केली. त्याचा प्रस्ताव मुस्कान हिने धुडकावून लावल्याने संतापलेल्या रईस याने तिला भररस्त्यातच जाळले.
संपादकीय भूमिकासरकारने अशा विकृतांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! |