भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न धर्मांध गेल्या कित्येक शतकांपासून पहात आहेत. यालाच ‘गजवा-ए-हिंद’ म्हणतात. यासाठी आजही प्रयत्न चालू आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. भारताचे झपाट्याने इस्लामीकरण होत असल्याचा दावा जर कुणी केला, तर त्याला वेड्यात काढले जाईल. तथापि हे सत्य असल्याचे झारखंडमधील गढवा येथे नुकतीच घडलेली घटना सांगते.
गढवा येथील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या ७५ टक्के इतकी झाल्याने मुसलमान समुदायातील तरुणांनी शाळेत इस्लामी नियम लागू करण्याची मागणी करत शाळेचे मुख्याध्यापक युगेश राम यांच्यावर त्यासाठी दबाव आणला. या तरुणांनी शाळेत बराच गोंधळ घातला. एवढेच नव्हे, तर त्यांनी शाळेच्या ‘दया कर दान विद्या का’ या प्रार्थनेत ‘तू ही राम है, तू रहीम है’ असा पालट करण्यास भाग पाडले. ही प्रार्थनासुद्धा पूर्वीप्रमाणे हात जोडून नव्हे, तर हाताची घडी घालून केली जात आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यावर ‘गढवा भारतात आहे कि पाकिस्तानात ?’, असा प्रश्न पडतो. प्रार्थनेसाठी हात जोडणे, हे केवळ हिंदुपण नाही, तर त्यामागे अध्यात्मशास्त्रही आहे. प्रार्थनेचा, तसेच याचकतेचा भाव हात जोडण्यातून व्यक्त होतो. हाताची घडी घातली, तर तो उद्दामपणा झाला. त्यात प्रार्थनेचा भाव येणार कुठून ? पण अशांना हे कोण सांगणार ? ज्यांनी सांगायला हवे, ते केवळ हिंदूंनाच उपदेश करण्यात धन्यता मानतात. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. येथील व्यवस्थाही धर्मनिरपेक्ष आहे. यासह ऊठसूठ जो तो नेता आणि पुरोगामी केवळ हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजतो. असे लोक धर्मांधांना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना अशा धर्मांधांच्या संदर्भात आठवते, ते केवळ त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य !
गढवा येथील शाळेत घडलेला प्रकार राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत भयंकर आहे. एका ग्रामीण भागातील शाळेत इतकी दादागिरी केली जात असेल, तर अन्य ठिकाणी काय होत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! धर्मांधांना भारताचे ‘गजवा-ए-हिंद’ करायचे आहे. गढवा येथील शाळेत झालेला प्रकार त्याचे लघुरूप आहे; म्हणूनच त्याला ‘गजवा-ए-गढवा’ असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगाने हात जोडून अभिवादन करण्याची पद्धत स्वीकारली. इकडे झारखंडमधील शाळेत मात्र हात जोडायच्या ऐवजी हाताची घडी घालून प्रार्थना करण्याचा चमत्कारिक प्रकार चालू करण्यात आला. जर धर्मांधांना हिंदूंच्या धर्मश्रद्धांवरच आक्षेप असेल, तर त्यांनाच ते कठीण होऊन जाईल; कारण हिंदू सूर्याला देव मानतात. मग ‘हिंदूंसाठी जे जे पवित्र, ते ते धर्मांधांसाठी निषेधार्ह’ या तत्त्वाने त्यांनी सूर्याच्या प्रकाशाचाही निषेध करायला हवा. हिंदु निसर्गाची पूजा करतात, मग धर्मांधांनी निसर्गाच्या सान्निध्यातही जायला नको. कुठे जे जे चांगले, ते ते अंगीकारण्याची शिकवण देणारा हिंदु धर्म, तर कुठे जे जे हिंदु धर्माचे, ते ते त्याज्य, अशी संकुचित मानसिकता असलेले धर्मांध ! या सर्व प्रकाराविषयी यच्चयावत पुरोगामी मूग गिळून गप्प आहेत.
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन कारणीभूत !
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे खासदार असतांना त्यांचे एक भाषण चांगलेच गाजले होते. त्यात त्यांनी ‘एखाद्या भागात जशजशी मुसलमानांची लोकसंख्या वाढत जाते, तसतसे त्यांचे वागणेही पालटत जाते’, अशा आशयाचे विधान केले होते. असाच काहीसा प्रकार गढवा येथे पहायला मिळतो. अल्पसंख्यांकांचे पराकोटीचे लांगूलचालन केले, तर काय होते, ते सध्या गढवा येथे पहायला मिळत आहे. हे अल्पसंख्य कुठल्या भागात, शाळेत, आस्थापनात आदी ठिकाणी बहुसंख्य झाले की, लगेच त्यांना तेथे त्यांच्या धर्मानुसार नियम हवे असतात. प्रार्थनेसाठी स्वतंत्र जागा हवी असते. त्यांच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ते आक्रमक होतात. अल्पसंख्य बहुसंख्य झाल्यावर सरकारी शाळेचेही एकप्रकारे मदरशात रूपांतर कसे होऊ शकते, याचे गढवा येथील घटना हे उत्तम उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक शाळांत असणार्या श्री सरस्वतीदेवीच्या चित्रांवर आक्षेप घेण्यात आला. श्री सरस्वतीदेवी ही विद्येची देवता असल्याने तिचे चित्र शाळेत असणे स्वाभाविक होते. त्यावर आजपर्यंत कुणाचा आक्षेप नव्हता; पण काहींच्या सडक्या मेंदूतून ही चित्रे काढून टाकण्याची कल्पना मांडली गेली आणि त्याच्या कार्यवाहीसाठी अनेकांनी बाह्या सरसावल्या. हेही काही धर्मद्रोही हिंदू करत असलेला ‘गजवा-ए-हिंद’चाच प्रकार म्हणावा लागेल. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, जे धर्मांधांना हवे असते, तेच धर्मद्रोही हिंदूंनाही हवे असते. दोघांचीही भाषा हिंदुविरोधीच असते. असे धर्मद्रोही हिंदू हे धर्मांधांचे अनुकरण करतात आणि धर्मांध धर्मद्रोही हिंदूंची ‘री’ ओढतात.
शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याविषयी केवळ मागणी केल्यावरही शिक्षणाचे भगवेकरण केले जात असल्याची ओरड करणारे पुरोगामी, तथाकथित शिक्षणतज्ञ, काँग्रेसवाले, साम्यवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदी आता गढवा येथे शाळेच्या होऊ पहाणार्या इस्लामीकरणाविषयी चकार शब्दही का काढत नाहीत ? याविषयी समस्त हिंदूंनी संघटित होऊन सरकारी यंत्रणांना वैध मार्गाने खडसावले पाहिजे; कारण आज शाळेत मुसलमानांची संख्या ७५ टक्के झाली म्हणून शाळेत इस्लामी नियम लागू करण्याची मागणी करण्यात आली. उद्या जर त्यांची संख्या वाढली, तर ते अभ्यासक्रमावरही आक्षेप घेऊन तो इस्लामनुसार करण्याची मागणी करतील, परवा ते शाळेच्या गणवेशावर आक्षेप घेऊन इस्लामनुसार पेहराव करण्याचा अट्टहास धरतील आणि त्याही पुढे जाऊन एक दिवस शाळेचे नावही पालटतील. ‘याचा आरंभच गढवा येथे झाला आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. हल्ली तथाकथित धर्मनिरपेक्ष शिक्षणपद्धतीत शाळेत ‘ग’ गणपतीचा न शिकवता, ‘ग’ गाढवाचा असे शिकवले जात असल्याचाच हा परिणाम आहे, दुसरे काय !
मुसलमान विद्यार्थी संख्येने अधिक असल्याने शाळेत इस्लामी नियम लागू करण्याची मागणी होणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! |