(म्हणे) ‘तुला अधिक दिवस जगू देणार नाही !’

भाजपचे नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ कपिल मिश्रा यांना जिहाद्याकडून हत्येची धमकी

प्रखर हिंदुत्वनिष्ठ कपिल मिश्रा

नवी देहली – भाजपचे देहली येथील नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ कपिल मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मिश्रा यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. मिश्रा यांना अकबर आलम नावाच्या जिहाद्याने ३ जुलैच्या सायंकाळी ई-मेल करून त्यामध्ये ‘आतंकवादी कपिल मिश्रा, तुला अधिक दिवस जगू देणार नाही ! माझ्या माणसांनी तुझ्यावर गोळीबार करण्याचे नियोजन करून ठेवले आहे’, असे लिहिले होते. मिश्रा यांनी या पत्राचे छायाचित्रच ट्वीटमध्ये जोडले आहे.

मिश्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, अशा धमक्यांना आम्ही न घाबरतो, न आम्ही आमचे कार्य थांबवू ! उदयपूर येथील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या कुटुंबांना साहाय्य करण्याचे आमचे अभियान अधिक गतीने चालेल. आमच्यासमवेत ‘रघुनाथ’ असतांना आम्हाला कशाची चिंता ! (कपिल मिश्रा यांच्यासारखी ईश्‍वरावरील अढळ श्रद्धा किती हिंदूंमध्ये आहे ? – संपादक) कपिल मिश्रा यांनी कन्हैयालाल यांच्या कुटुंबाची भेट घेऊन ‘कन्हैयालाल यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करावे’, असे हिंदूंना आवाहनही केले होते. या माध्यमातून मिश्रा यांनी १ कोटी रुपये गोळा केले आहेत.

हिंदु सेनेचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी नेते हेही जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य !

  • भाजपचे देहलीतील माजी माध्यम प्रमुख नवीनकुमार जिंदाल, तसेच हिंदु सेनेचे देहली विभागाचे अध्यक्ष दीपक मलिक यांनाही जिहादी आतंकवाद्यांकडून शिरच्छेद करून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यांनी पोलिसांत यासंदर्भात तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.
  • भाजपचे तत्कालीन नेते नवीनकुमार जिंदाल यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पक्षाने त्यांना बडतर्फ केले आहे. दुसरीकडे दीपक मलिक यांच्या नेतृत्वाखाली हिंदु सेनेने २० जून या दिवशी नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्या समर्थनार्थ देहलीत हनुमान चालिसाच्या पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
  • मलिक यांनी पोलिसांकडे २२ भ्रमणभाष क्रमांकांची एक सूचीच दिली असून ‘मला या क्रमांकांवरून वारंवार जिवे मारण्याच्या आणि अपशब्द बोलण्याचे दूरभाष येत आहेत’, असे ते म्हणाले. यांमधील काही क्रमांक हे पाकिस्तानचेही आहेत.

संपादकीय भूमिका

  • ‘जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे’, या परिस्थितीलाही आता नूपुर शर्मा यांनाच उत्तरदायी ठरवायचे का ?
  • बहुसंख्य हिंदूंच्याच देशात त्यांच्या हितांसाठी कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याच्या धमक्या मिळणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! ही परिस्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !
  • जर हिंदु नेत्यांच्या जिविताला धोका निर्माण होत असेल, तर सर्वसामान्य हिंदु जनतेची काय स्थिती असेल, याची कल्पनाही करता येणार नाही !
  • अभिव्यक्ती तसेच विचार स्वातंत्र्य यांचा उदोउदो करणारे धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी आता मात्र गप्प आहेत. हिंदूंनो, अशा हिंदुविघातक दुटप्पीपणाच्या विरोधात आता एकसंधपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे, हे जाणा !