बालसत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मानस पाद्यपूजा करतांना ‘ते प्रत्येक बालसाधकासाठी वेगवेगळे रूप घेऊन आले आहेत’, असे अनुभवणारी कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) !

कु. प्रार्थना पाठक
कु. अपाला औंधकर

मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात असल्याने मी बालसाधकांच्या सत्संगात ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. सत्संगात कु. अपालाताईने (कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पाद्यपूजा सांगितली. त्या वेळी ‘साक्षात् परात्पर गुरु डॉक्टर पाद्यपूजेसाठी आले आहेत’, असे मला जाणवत होते. सर्व बालसाधकांना एकाच स्वरूपाची पूजा करणे शक्य नसल्याने ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक बालसाधकासाठी वेगवेगळे रूप घेऊन आले आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होत होती. – कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१२.२०२१)