हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण आणि बलात्कार

इस्लाम स्वीकारण्यासही भाग पाडले

हमीरपूर (उत्तरप्रदेश) – येथील झाकीर नावाच्या मुसलमानाने त्याच्या दोन मुसलमान साथीदारांच्या साहाय्याने येथील एका २० वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला ६ मास ओलीस ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. पीडित मुलीने झाकीरच्या तावडीतून स्वतःच्या सुटका करून पोलीस ठाणे गाठल्याने ही लव्ह जिहादची घटना समोर आली.

उत्तरप्रदेशच्या हमीपूर जिल्ह्यातील रथ तहसीलमधील हिंदु तरुणी ६ मासांपूर्वी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. झाकीर आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिला बेशुद्ध करून तिचे अपहरण केले. गुरुग्राम येथे एका खोलीत तिला ६ मास कोंडून ठेवले. या ६ मासांमध्ये झाकीरने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. तिने विरोध केला असता तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलीने एक दिवस संधी साधून झाकरीच्या तावडीतून सुटका करून घेतली, अशी माहिती टीव्ही ९ या वृत्तसंस्थेने दिली. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी माझगव्हाण पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रभारी पंढरी सरोज यांनी दिली.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादच्या इतक्या घटना घडूनही सरकारी यंत्रणा त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा घटना रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !