नेपाळमध्ये एका व्यक्तीला लुटणार्‍या तिघा भारतियांना अटक

काठमांडू – नेपाळच्या पश्‍चिम भागात असलेल्या दादेलधुरा जिल्ह्यातील आलिटाल ग्रामीण नगरपालिका क्षेत्रामध्ये ३ भारतियांनी संगणकतज्ञ लोकेंद्र सिंह भंडारी यांना लुटले. तिघांनी भंडारी यांच्याकडे त्यांच्या चारचाकी वाहनातून अन्य ठिकाणी सोडण्याची विनंती केली. भंडारी त्यांना वाहनात बसण्याची अनुमती दिली. वाहन एका निर्जनस्थळी पोचताच तिघांनी भंडारी यांच्यावर आक्रमण केले. त्यांना मारहाण केली, त्यांच्याकडील ऐवज लुटला आणि त्यांना एका झाडाला बांधून तिघेही चारचाकी घेऊन पसार झाले. पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण करून तिघांसमवेत चारचाकी वाहन कह्यात घेतले आहे. सर्व आरोपी हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत.