पुणे – सिंहगड येथे २५ जूनच्या रात्री दरड कोसळून हेमांग गाला या तरुण गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक लोक यांनी घटनास्थळी धाव घेतली अन् त्याला शोधण्याचे कार्य चालू केले. अथक परिश्रमानंतर हेमांगचा मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली आढळला.