ठाणे, २७ जून (वार्ता.) – कोट्यवधी रुपयांचा पैशांचा पाऊस पडेल, या आमिषाला बळी पाडून एका बांधकाम व्यावसायिकाची ५६ लाख रुपयांची रक्कम घेऊन एका भोंदूबाबासह ५ भामटे पसार झाले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील दावडी गावातील पाटीदार भवन येथे असलेले बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्या कार्यालयात ही घटना घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह ५ भामट्यांवर विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.