रात्री झोपण्यापूर्वी टाळूला आणि पायांच्या तळव्यांना खोबरेल तेल लावणे अन् रात्री भ्रमणभाषचा वापर टाळणे, या उपायांमुळे अनेक वर्षे असलेली झोप न लागण्याची समस्या केवळ ४ दिवसांतच दूर होणे

श्री. नंदकुमार कैमल

पूर्वी मला रात्री सत्संग संपल्यावर भ्रमणभाषवर ‘व्हॉट्स ॲप’ मध्ये बातम्या बघणे, दैनिक वाचणे आणि इतर संकेतस्थळांवरील बातम्या पहाणे, अशी सवय होती. त्यामुळे मला रात्री नीट झोप लागत नव्हती. झोपल्यानंतरही मला अधूनमधून उठावे लागायचे.

वर्ष २०२१ च्या फेब्रुवारी मासात सहसाधकाने रामनाथी आश्रमात त्याच्या उपचारांसाठी संपर्क केला होता. तेव्हा रामनाथी आश्रमातील वैद्य मेघराज पराडकर यांनी त्यांना काही आयुर्वेदीय उपचार सांगितले. त्यांतील एका उपचारानुसार रात्री झोपण्यापूर्वी मी टाळूला आणि पायांच्या तळव्यांना खोबरेल तेल लावले, तसेच रात्री झोपण्यापूर्वी भ्रमणभाषचा वापर करण्याचे टाळले. या सोप्या उपायांमुळे मला सलग चार-साडेचार घंटे झोप लागली. हा उपचार केल्यावर मला केवळ ४ दिवसांतच पालट जाणवला. मागील २० – २२ वर्षांपासून असलेली झोप न लागण्याची समस्या या सोप्या उपचाराने केवळ चारच दिवसांत सुटली.

– श्री. नंदकुमार कैमल, कोची, केरळ. (६.२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक