पाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मासेमारांची सुटका

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मासेमारांची नुकतीच सुटका करण्यात आली. पाकिस्तानच्या समुद्रात अवैधरित्या मासेमारी केल्याच्या प्रकरणी गेली ५ वर्षे ते कराचीच्या कारागृहात खितपत पडले होते.

(सौजन्य : TV9 Bharatvarsh)

या मासेमारांना कराचीच्या लांधी भागातील मालीर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ‘वाघा सीमेवर जाण्यासाठी मासेमारांना लाहोरला पाठवण्यात आले आहे. तेथे त्यांना भारतीय अधिकार्‍यांच्या कह्यात दिले जाईल’, अशी माहिती कारागृह अधीक्षक महंमद इरशाद यांनी दिली. या मासेमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने जून २०१८ मध्ये अटक केली होती.