स्वातंत्र्यवीर सावरकर हे जागतिक उंचीचे व्यक्तिमत्त्व ! – रमणलाल शहा, ज्योतिष विशारद

सातारा, १९ जून (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जागतिक उंचीचे व्यक्तिमत्त्व होते, असे गौरवोद्गार ज्योतिष विशारद रमणलाल शहा यांनी काढले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘वीर सावरकरांचा मृत्यूशी संवाद’ या अभिवचनाच्या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहरप्रमुख शिरीष चिटणीस, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, हिंदु महासभा सातारा जिल्हा कोषाध्यक्ष उमेशजी गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

रमणलाल शहा पुढे म्हणाले, वीर सावरकर यांचे साहित्य हे अग्निरसासारखे होते. अखंड भारत व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते. महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण भारत देशाला स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर यांनी दिशा देण्याचे काम केले.