१. ‘साधकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांविषयी चिंतन कशा प्रकारे करायला पाहिजे ?’, हे सद्गुरु पिंगळेकाकांनी शिकवणे
‘२२.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात दैनिकाशी संबंधित सेवा करणाऱ्या साधकांनी ‘वरवरची सेवा केल्यामुळे साधनेची हानी कशी होते आणि गुरुदेवांनी साधकांना कसे साहाय्य केले ?’, याविषयी लिहिले होते. हा लेख वाचल्यानंतर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी देहली येथील सनातन सेवाकेंद्रातील सत्संगात हा लेख मोठ्याने वाचायला सांगितला. त्यांनी ३ साधकांना त्या लेखातील एक एक सूत्र वाचण्यास आणि त्या सूत्रांविषयीचे चिंतन सांगायला सांगितले, तसेच ‘चिंतन करण्यात आपण स्वतः कुठे न्यून पडत आहोत ?’, हेही सांगायला सांगितले.
२. स्वतःकडून दैनिकाचे केवळ वाचन होत असल्याची जाणीव होणे
साधक दैनिकातील सूत्र वाचत असतांना माझ्याकडून केवळ ऐकणे होत होते; परंतु जेव्हा साधकांनी त्यांचे चिंतन सांगणे चालू केले, तेव्हा त्यांचे चिंतन ऐकून ‘स्वतः कुठे न्यून पडतो ?, याविषयीची सूत्रे काढायला पाहिजेत’, असे मला वाटले. नंतर माझ्या लक्षात आले, ‘मी दैनिकाचे केवळ वाचन करते आणि काही प्रमाणात शिकायला मिळालेली सूत्रे कधी कधी लिहिते.’
३. ‘दैनिकाचा अभ्यास कसा करायला पाहिजे ?’, हे शिकायला मिळणे
सद्गुरु पिंगळेकाकांनी दैनिकातील तो लेख सर्वांसमोर वाचायला आणि त्याचे चिंतन करायला सांगितल्यावर त्यातून मला ‘दैनिकाचा अभ्यास कसा करायला पाहिजे ? दैनिकातील प्रत्येक सूत्र वाचून ते स्वतःला कसे लागू होते किंवा स्वतः कुठे न्यून पडत आहोत ?’, याचा अभ्यास करायचा, म्हणजे खऱ्या अर्थाने दैनिक वाचन होते आणि त्याचा लाभ होतो’, हे शिकायला मिळाले.
४. ‘लेखाचा लाभ प्रसारात सेवा करणाऱ्या साधकांनासुद्धा व्हावा’, यासाठीची सद्गुरु पिंगळेकाकांची तळमळ !
अ. सद्गुरु पिंगळेकाकांनी प्रसारातील साधकांसाठी प्रतिदिन सकाळी होत असलेल्या भाववृद्धी सत्संगात दैनिक ‘सनातन प्रभात’मधील हा लेख वाचून दाखवायला सांगितला आणि ४ उत्तरदायी साधकांना प्रत्येक सूत्राचे चिंतन सांगायला सांगितले.
आ. यामागे सद्गुरु काकांचा पुढील उद्देश होता, ‘उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून लेखाचे वाचन केल्याने आणि त्याविषयीचे चिंतन सांगितल्यामुळे प्रतिदिन सत्संगात प्रसारातील जे साधक जोडले जातात, त्यांनासुद्धा या लेखाचा लाभ होईल. साधकांना ‘स्वतःचे चिंतन कसे करायला पाहिजे ? स्वतः कुठे न्यून पडतो ? कुठे पालट करायला पाहिजे ? पालट कसा करायचा आहे ?’, हे शिकायला मिळेल, तसेच त्यांचे साधनेचे आणि सेवेचे प्रयत्न वाढतील.’
यातून ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखाचा लाभ केवळ सेवाकेंद्रातील साधकांनाच नाही, तर प्रसारात सेवा करणाऱ्या सर्व साधकांनाही व्हावा’, यासाठीची सद्गुरु काकांची तळमळ शिकायला मिळाली. सद्गुरु काका आणि गुरुदेव यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
‘हे गुरुदेवा, ‘आपल्याला अपेक्षित असा अभ्यास करणे, आत्मचिंतन करणे आणि साधनेचे प्रयत्न करणे’, हे आपणच आम्हाला शिकवा अन् आमच्याकडून करवून घ्या’, अशी आपल्या श्री चरणी आम्हा सर्व साधकांची आर्त प्रार्थना आहे.’
– कु. मनीषा माहूर, देहली (२४.८.२०२१)