कतारमध्ये जागतिक फूटबॉल चषक स्पर्धा पहाण्यासाठी येणार्‍यांवर मद्यबंदीसह अनेक बंधने !

दोहा (कतार) – यावर्षी नोव्हेंबर मासामध्ये कतारमध्ये जागतिक फूटबॉल चषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी जगभरातील फूटबॉलप्रेमी सामने पहाण्यासाठी कतारमध्ये येणार आहेत. त्या संदर्भात कतारकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी येणार्‍या दर्शकांवर मद्यबंदी करण्यात येणार आहे. मेजवान्यांवर बंदी असणार आहे. तसेच दांपत्य नसणार्‍यांना शारीरिक संबंध ठेवण्यावर बंदी असणार आहे. या निमयमांचे उल्लंघन करार्‍यांना ७ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. कतारमध्ये विवाहबाह्य शारीरिक संबध आणि समलैंगिकता हे अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे समलैंगिकतेचे समर्थन करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या झेंड्यांवरही बंदी असणार आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांमध्ये पाश्‍चात्त्य विकृतीवर घालण्यात आलेली ही बंदी सर्वांनाच शिकण्यासारखी आहे !