वेळेचे सुनियोजन करून राष्ट्र आणि धर्मकार्य यांसाठीही वेळ द्या !

मनुष्यजन्म वारंवार मिळत नाही, म्हणून मानवी जीवनातील काळ हा बहुमूल्य आहे. प्रत्येकाचे आयुष्य मर्यादित आणि अनिश्चित काळ आहे. या मर्यादित आणि अनिश्चित काळातच आपल्याला मनुष्यजन्माचे सार्थक करायचे आहे. या वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करून अधिकाधिक वेळ सत्कारणी, म्हणजे देव, देश आणि धर्म यांच्यासाठी दिला पाहिजे. त्यासाठी वेळेचा अपव्यय टाळून परिश्रमपूर्वक कर्म करणे आवश्यक आहे. देवाला प्रार्थना करून नियोजन आणि कृती केल्याने कार्य वेळेत पूर्ण होण्यासाठी साहाय्य होईल !