५०० वर्षांनंतर मंदिरावर फडकला ध्वज !
पावागड (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावागड डोंगरावरील पुनर्विकसित श्री कालिकामाता मंदिराचे उद्घाटन केले. या मंदिराच्या कळसावर ५०० वर्षांनंतर ध्वज फडकावण्यात आला. मुसलमान आक्रमकांनी येथे मंदिराच्या ठिकाणी दर्गा बांधला होता. तो हटवून येथे पुन्हा मंदिर बांधण्यात आले आहे.
पावागढ़ कालिका माता मंदिर में PM मोदी ने की पूजा, 500 सालों बाद लहराया शिखर ध्वज, सदियों पुराना है इतिहास #narendramodi #KalikaMatatemple #Pavagadh https://t.co/DTsEHxdlM6
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) June 18, 2022
या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज काही शतकांनंतर मंदिरांच्या कळसावर पुन्हा ध्वज फडकत आहे. हा ध्वज केवळ आमची श्रद्धा आणि अध्यात्म यांचेच प्रतीक नाही, तर शतके, युगे पालटतात; मात्र श्रद्धेचा कळस शाश्वत रहातो, याचे प्रतीक आहे.