देशातील वाढती इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचार यांच्या विरोधात कारवाई करा !

बजरंग दलाचे मिरज, जत आणि ईश्वरपूर येथे निवेदन

मिरज, १७ जून (वार्ता.) – गेल्या काही काळापासून देशभरात इस्लामिक जिहादी कट्टरता वाढत आहे. हिंदूवर योजनापूर्वक आक्रमणे होत आहेत. नुकतेच नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावरून गेल्या २ शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर मशिदीमधून आक्रमण करण्यात आले. हिंदूंची घरे, दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. सरकारी मालमत्ता आणि मंदिरे यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली. पोलीसदलावरही आक्रमण झाले. तरी देशातील वाढती इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचार यांच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने मिरज, जत आणि ईश्वरपूर येथे देण्यात आले.

मिरज येथे निवेदन देतांना सर्वश्री आकाश जाधव, सचिन भोसले, हरीश पाटील, चेतन पाटील, रोहीत पाटील, सचिन माळी, अमोल कोरे, संतोष शहापूरकर, राहुल भोसले, प्रशांत नाईक, लक्ष्मण हुलवान, शशांक छत्रे, अनिकेत हेलवाडे, दीपक हेलवाडे उपस्थित होते.

या वेळी करण्यात आलेल्या मागण्या

१. शुक्रवारी झालेल्या नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडलेल्या उन्मादी जमाव आणि दंगलखोर यांची ओळख पटवून त्यांच्यावर ‘रासुका’ अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

२. मुसलमानांचे जे नेते, मुल्ला, मौलवी समाजाला भडकवण्याचे काम करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी.

३. ज्या हिंदूंना धमक्या दिल्या जात आहेत, त्यांना सुरक्षा पुरवावी आणि धमकी देणार्‍यांवर कडक कारवाई करावी.

४. इस्लामिक जिहादी धर्मांधता पसरवून देशात हिंसाचार पसरवणार्‍यांना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘तबलिगी जमात’ यांसारख्या कट्टर संघटनांवर तात्काळ बंदी घालावी.