रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभे करणार्‍यांना आता १ सहस्र रुपये दंड

लवकरच कायदा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

नवी देहली – रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभे करणार्‍यांना आता १ सहस्र रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात दिली. यासाठी लवकरच नवा कायदा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गडकरी पुढे म्हणाले, ‘‘रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणे अत्यंत धोकादायक आहे. शहरी भागांतील कारच्या वाढत्या संख्येमुळे चुकीच्या पद्धतीने पार्किंग करण्याचे प्रकार घडत आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे कार असली, तरी ते पार्किंगसाठी जागा निर्माण करत नाहीत. सध्या रूंद रस्त्यांकडे ‘पार्किंगची जागा’ म्हणून पाहिले जात आहे. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्किंग केल्याचे छायाचित्र पाठवणार्‍याला ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.’’

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे !