शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचाराचा बजरंग दलाकडून निषेध

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – नूपुर शर्मा यांच्या महंमद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह विधानावरून १० जून या दिवशीच्या शुक्रवारच्या नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ बजरंग दल रस्त्यावर उतरला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशमधील कानपूर, गोरखपूर, वाराणसी इत्यादी ठिकाणी निदर्शने केली.  ठिकठिकाणी हनुमान चालिसाचे पठणही करण्यात आले. या वेळी हिंसाचारातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

वाराणसीच्या शास्त्री घाटावर बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली अन् हनुमान चालिसाचे पठण केले. बजरंग दल काशी प्रांताचे सहसंयोजक कृपा शंकर तिवारी यांनी हिंसाचारातील आरोपींवर ‘रासुका’ (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.