मी इस्लामपेक्ष हिंदु धर्माचा लाख पटींनी सन्मान करतो ! – गिर्ट विल्डर्स

नेदरलँड्सच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गिर्ट विल्डर्स (डावीकडे)  नूपुर शर्मा (उजवीकडे)

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारे नेदरलँड्सच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गिर्ट विल्डर्स यांनी पुन्हा भारताच्या संदर्भात ट्वीट केले आहे. विल्डर्स म्हणाले, ‘‘सांस्कृतिक सापेक्षतावाद ही एक भ्रामक संकल्पना आहे. लोक समान असले, तरी संस्कृती वेगवेगळ्या आहेत. ‘मानवता आणि स्वातंत्र्य’ यांवर आधारित संस्कृती ही ‘असहिष्णुता आणि दास्यत्व’ यांवर आधारित संस्कृती यापेक्षा नेहमीच चांगली असते. त्यामुळे मी इस्लामपेक्ष हिंदु धर्माचा लाख पटींनी सन्मान करतो !’’

विल्डर्स यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये  #IsupportNupurSharma (मी नूपुर शर्मा यांचे समर्थन करतो) या हॅशटॅगचा वापरही केला.