अलीगड मुस्लिम विद्यापिठात ‘डोके धडापासून वेगळे करा’च्या चिथावणीखोर घोषणा !

  • नूपुर शर्मा प्रकरण

  • शर्मा यांना फासावर लटकवण्याचीही मागणी

नूपुर शर्मा

अलीगड (उत्तरप्रदेश) – भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानाच्या विरोधात अलीगड मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध मोर्च्यात पोलिसांसमोरच ‘डोके धडापासून वेगळे करा’, अशा  प्रक्षोभक घोषणा दिल्या. (स्वतःसमोर चिथावणीखोर घोषणा देणार्‍यांना रोखू न शकणारे पोलीस काय कामाचे ? अशा पोलिसांवरच कारवाई केली पाहिजे ! – संपादक) यासह त्यांनी शर्मा यांना फासावर लटकवण्याचीही मागणी केली. नूपुर शर्मा यांच्या निषेधार्थ या विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर प्राध्यापकांनीही ‘मेणबत्ती मोर्चा’ काढला.

या वेळी अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी नेता जानिब हसन म्हणाला, ‘‘आम्ही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करतो. असे प्रथमच झालेले नाही. गेल्या काही काळापासून भारतीय प्रसारमाध्यमे आणि भाजपचे नेते मुसलमानांना लक्ष्य करत आहेत. हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.’’ माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘शर्मा यांच्या विरोधात येत्या ४८ घंट्यांत कारवाई करावी, अन्यथा आम्ही संपूर्ण जिल्ह्यात निषेध आंदोलन करू’, अशी चेतावणी विद्यार्थ्यांनी दिली आहे. शर्मा यांना फासावर लटकवण्याची मागणीही या प्रसंगी करण्यात आली.
यासह शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या महामंडलेश्‍वर अन्नपूर्णा गिरी यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • कुठल्याही गुन्ह्याला भारतीय दंडविधानात शिक्षा देण्याची तरतूद असतांना  मुसलमान नेहमी अशा प्रकारे कायदा हातात घेण्याची भाषा का करतात ? अशा घोषणा देणे म्हणजे ते भारताची राज्यघटना मानत नसल्याचे द्योतक आहे. अशांवर योगी आदित्यनाथ सरकारने कारवाई केली पाहिजे !
  • अशा चिथावणीखोर विधानांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे आता पोलिसांना वाटत नाही का ?