‘वर्ष २०१९ मध्ये अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र्र अधिवेशनासाठी मागील वर्षीच्या तुलनेत समाजातून अर्पण सहज मिळत होते. या वेळी मनावर कुठलाच ताण नव्हता किंवा ‘कसे होणार ? काय करायचे ?’, अशी चिंताही नव्हती. याचे चिंतन करत असतांना देवानेच काही सूत्रे लक्षात आणून दिली.
रामनाथी आश्रमात या वर्षभरात अनेक यज्ञ, अनुष्ठाने आणि पूजा झाल्या, तसेच सनातनच्या संतांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे वातावरणात सात्त्विक पालट झाल्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे हे सहज शक्य झाले. आम्ही ज्या व्यक्तींना धर्मकार्यासाठी अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले, त्या व्यक्ती ते सहजतेने देत होत्या. या वेळी समाजातील काही नवीन व्यक्ती जोडल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्पण घेतांना पुष्कळ आनंद मिळत होता.
‘मला हे सर्व भगवंताने अनुभवायला आणि शिकायला दिले’, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता ! ‘हे श्रीकृष्णा, परात्पर गुरु डॉक्टर, माझ्याकडून अधिकाधिक सेवा करवून घ्या’, अशी प्रार्थना !’
– श्री. सुरजित नारायण जगदीश माथूर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |