वीजटंचाईमुळे पाकची राजधानी इस्लामाबादमधील विवाह समारंभांवर निर्बंध

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील आर्थिक संकटामुळे येथे विजेचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच अधिकाधिक वीज वाचवण्याच्या उद्देशाने पाक सरकारने मोठ्या समारंभांवर रात्री १० वाजेनंतर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

याची कार्यवाही ८ जूनपासून चालू करण्यात आली आहे. सध्या हा नियम राजधानी इस्लामाबाद शहरासाठीच लागू करण्यात आला असला, तरी भविष्यातील या संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांपर्यंतही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.