नूपुर शर्मा यांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे पोलिसांनी पुरवली सुरक्षा !

नवी देहली – भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना देहली पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. शर्मा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने अज्ञात लोकांच्या विरोधात याआधीच गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पक्षाने निलंबित केल्यानंतर शर्मा यांनी ‘मी पक्षातच लहानाची मोठी झाले. पक्षाच्या निर्णयाचा मी सन्मान करते. मला हा निर्णय मान्य आहे’, असे वक्तव्य केले. अनेक मुसलमान देशांनी भारताचा विरोध केल्यानंतर भाजपने शर्मा यांच्या विरोधात ५ जून या दिवशी निलंबनाची कारवाई केली. तसेच देहली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना पक्षातून बडतर्फ केले.