जोधपूर (राजस्थान) – येथे मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतर येथे लागू असलेल्या जमावबंदीच्या कलम १४४ च्या आदेशाची समयमर्यादा वाढवण्यात आली आहे. येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील समजल्या जाणार्या सूरसागर भागातील रॉयल्टी परिसरात मुसलमान आणि हिंदु तरुणांमध्ये ७ जून या दिवशी दुचाकी उभी करण्यावरून झालेल्या वादातून येथे मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ५ पोलीस ठाण्यांतील पोलीस घटनास्थळी धावून आले. या हिंसाचारात २ जण घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. जोधपूरमध्ये २ मे या ईदच्या दिवशीही मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’ याच्या) घोषणा देत हिंसाचार करण्यात आला होता.
जोधपुर में एक बार फिर सांप्रदायिक तनाव पैदा हो गया https://t.co/1bW3HblgXP
— AajTak (@aajtak) June 7, 2022
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात उद्दाम झालेले दंगलखोर मुसलमान ! ‘काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट’ हेच यातून पुनःपुन्हा लक्षात येते ! |