नूपुर शर्मा यांनी पैगंबरांविषयी सत्य तेच सांगितल्याने भारतियांनी तिचा बचाव करावा ! – नेदरलँडचे खासदार  गिर्ट विल्डर्स

नूपुर शर्मा यांचा बचाव केल्याने गिर्ट विल्डर्स यांनाही ठार मारण्याच्या धमक्या

भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा व नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स

अ‍ॅम्स्टरडम (नेदरलँड) – नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचे सत्य सांगितल्यानंतर अरब आणि इस्लामी देश संतप्त होणे अत्यंत हास्यास्पद आहे. भारताने या प्रकरणी क्षमा का मागावी ? उलट भारतियांनी नूपुर शर्मा यांचा बचाव केला पाहिजे, असे विधान नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले. यानंतर गिर्ट यांनाही ठार मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. पाकिस्तान, तुर्कीये आदी देशांतून या धमक्या मिळत आहेत. यावरही गिर्ट यांनी म्हटले की, अशा धमक्यांमुळे काहीही साध्य होणार नाही. मी सत्य बोलण्यापासून परावृत्त होणार नाही.

गिर्ट विल्डर्स यांनी ट्वीट करून म्हटले की, लांगूलचालन करण्याचा काहीही उपयोग नाही. ते एखाद्या गोष्टीला अधिक वाईट बनवते. यामुळे मी माझ्या भारतातील मित्रांना सांगतो की, त्यांना इस्लामी देशांच्या धमकीला महत्त्व देऊ नये. स्वातंत्र्यासाठी उभे ठाकावे आणि नूपुर शर्मा यांचा बचाव करवा. कारण त्यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी सत्य तेच सांगितले आहे.