श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांचे शिखांना आवाहन
अमृतसर (पंजाब) – येथील श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी शिखांना आवाहन केले आहे, ‘वर्ष १९४७ नंतर शिखांना दाबण्याचे धोरण राबवले गेले. धार्मिक आणि राजकीय स्वरूपामध्ये शिखांना दुर्बल बनवण्यात आले. आता त्यांनी सक्षम होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवावे, तेव्हाच देशावर शिखांचे राज्य येईल.’ गेल्या मासामध्ये ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी शिखांना स्वतःजवळ परवाना असलेली आधुनिक शस्त्रे बाळगण्याचे आवाहन केले होते.
#OperationBlueStar anniversary: Akal Takht Jathedar talks about churches, weapons training for youth@kamalsinghbrar reportshttps://t.co/ywivmUSbuD
— The Indian Express (@IndianExpress) June 6, 2022
ते पुढे म्हणाले की, सध्या ख्रिस्त्यांचा प्रचार जोरात चालू आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला संघटित होऊन मैदानात उतरले पाहिजे. गावागावांत जाऊन आवाज उठवायला हवा. जर आपण धार्मिक स्वरूपात सशक्त झालो नाही, तर आर्थिक स्वरूपात शक्तीशाली बनू शकणार नाही आणि त्यामुळे राजकीय स्वरूपातही दुर्बल बनून राहू.
संपादकीय भूमिका
|