इतरांना निःस्वार्थीपणे साहाय्य करणारी आणि सेवेची तीव्र तळमळ असलेली मिरज येथील कु. सिद्धी उमेश पडियार !

कु. सिद्धी उमेश पडियार

सौ. तनुजा उमेश पडियार आणि श्री. उमेश पडियार, (कु. सिद्धीचे आई-वडील) मिरज

श्री. उमेश पडियार

१. नम्र आणि समंजस : ‘कु. सिद्धी लहानपणापासूनच शांत आणि संयमी आहे. तिने कधीही कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही.

२. प्रेमभाव : ती घरातील सर्वांची आवर्जून विचारपूस करते. घरातील कोणीही रुग्णाईत असल्यास सिद्धी ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप’ या ग्रंथातून नामजप पाहून संबंधित व्यक्तीला तो नामजप करायला सांगते. ती रुग्ण व्यक्तीला अधिकाधिक नामजपादी उपायही करायला सांगते. तसेच ती त्यांनी (रुग्णाईत व्यक्तीने) औषध घेतले कि नाही, याविषयीही विचारपूस करते.

३. लहानपणापासून अध्यात्म आणि साधना यांची आवड असणे : सिद्धीला लहानपणापासून अध्यात्माची आवड आहे. ती वर्ष १९९७ पासून सनातन संस्थेच्या संपर्कात आहे. ती बालसाधक असतांना तिला ग्रंथ प्रदर्शनकक्ष लावणे आणि प्रसार करणे आदी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. वर्ष २०१८ पासून ती नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘अपलोडिंग’ची सेवा करत आहे.

सौ. तनुजा उमेश पडियार

४. चित्रकलेची आवड असणे : तिला चित्रकला अतिशय आवडते. तिने प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) हुबेहूब चित्र काढले आहे.

५. कुटुंबियांना व्यष्टी साधनेसाठी साहाय्य करणे : तिने मला (सौ. तनुजा उमेश पडियार यांना) ‘सारणीत चूक कशी लिहायची ? स्वयंसूचना कशा बनवायच्या ?’, हे सोप्या शब्दांत समजावून सांगितले. मला स्वयंसूचना बनवतांना अडचण आल्यास ती चुकांच्या मुळाशी जाऊन मला समजेपर्यंत प्रेमाने सांगते.

६. कठीण प्रसंगात स्थिर रहाणे : तिच्या आजीचे (आईच्या आईचे) निधन झाले. तेव्हा तिने आम्हा बहिणींना (सौ. तनुजा उमेश पडियार आणि त्यांच्या बहिणी यांना) धीर देऊन नामजप करायला सांगितला. वर्ष २००८ मध्ये आम्हाला घराचे स्थलांतर करायचे होते. त्या वेळी सिद्धीची महाविद्यालयीन परीक्षा होती, तसेच तिच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. तेव्हा तिने स्थलांतराचे काम स्थिर राहून पूर्ण केले.

७. तत्परतेने आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्धता करणे : आपत्काळाची सिद्धता म्हणून आमच्यासाठी आमच्या दोन्ही मुलींनी (सिद्धी आणि लहान मुलगी एकता यांनी) घर घेण्याची सिद्धता केली. त्यांनी आवश्यक वस्तूंची सिद्धता केली, उदा. धान्य, लागवडीसाठी कुंड्या घेणे, विजेरी (‘बॅटरी’), आकाशवाणीसंच (‘रेडिओ’)

८. कर्तेपणा ईश्वराला देणे : सिद्धीच्या बोलण्यात ‘ईश्वरच सर्वकाही करवून घेतो’, असे असते. तिने केलेल्या सेवेविषयी तिला अहं किंवा कर्तेपणा नसतो. ती आत्मनिवेदन करून सेवा चालू करते. ती प्रत्येक सेवा अनुसंधानात राहून करते.

९. गुरूंप्रती भाव : घराचे बांधकाम करतांना तिने ‘प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) आश्रम आहे’, या भावाने सर्व कामे केली.’

सौ. हिना परमार (कु. सिद्धीची मावशी)

सौ. हिना परमार

व्यष्टी साधनेत साहाय्य करणे : ‘सिद्धी माझ्यापेक्षा वयाने लहान असूनही ती मला ‘माझ्यातील कोणत्या स्वभावदोषांवर प्रयत्न करायला हवेत ? त्यावर स्वयंसूचना कशा बनवायच्या ?’, याविषयी समजावून सांगते. ‘लवकर प्रयत्न करून साधनेत पुढे जायचे आहे’, असे तिचे विचार असतात.

एकदा आमची प.पू. गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) भेट झाली होती. तेव्हा गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘थोड्या थोड्या दिवसांनी सिद्धीला साधनेचा आढावा द्या.’ गुरुदेवांच्या बोलण्याची मला प्रचीती आली.’

सौ. एकता दिनेश दबडे (सिद्धीची बहीण) आणि श्री. दिनेश दबडे (सिद्धीचे भाऊजी)

१. ‘सिद्धी इतरांना निःस्वार्थीपणे साहाय्य करते.

२. समंजस : तिच्यात ऐकून घेण्याची वृत्ती आहे. ती इतरांचे बोलणे समजून घेऊन नंतर बोलते. तिच्यात संयम आहे.

३. निर्भीड : सनातन संस्थेबद्दल कोणाचे काही नकारात्मक वक्तव्य ऐकल्यास ती निर्भीडपणे त्यांना ‘योग्य काय आहे ?’, हे सांगते.

४. सेवेची तळमळ

अ. सेवा करण्यास साधक उपलब्ध होत नसल्यास ती स्वतः सेवा करते आणि काही अडचणी आल्यास सकारात्मक राहून सेवा पूर्ण करते.

आ. सिद्धीमध्ये सेवेची तळमळ आहे. ती झोकून देऊन सेवा करते. ती प्रतिदिन कार्यालयीन काम करून घरी आल्यावर घरातील काम आवरून नंतर सेवा करते. ती कोणत्याही परिस्थितीत सेवा करण्यास नकार देत नाही. तिला रात्रीची सेवा असूनही ती उत्साहाने सेवा पूर्ण करते. ती घरातील सेवा आणि कार्यालयीन काम यांमध्ये ताळमेळ ठेवते. ‘प.पू. गुरुदेवांनी दिलेली सेवा आहे. ती चुकायला नको’, असा तिचा भाव असतो.’

श्री. चेतन नाटक (कार्यालयीन सहकारी)

१. सिद्धीचे बोलणे आणि वागणे साधे आहे.

२. नम्रता : आता ती नोकरी करत असलेल्या ठिकाणी व्यवस्थापनाने तिला सर्व कामाचे उत्तरदायित्व दिले आहे, तरीही ती सर्वांशी नम्रपणे वागते.

३. चुकांविषयी संवेदनशीलता : एखादा प्रसंग झाल्यास त्यात ‘स्वतःचे काही चुकले आहे का ?’, याकडे तिचे लक्ष असते. ती समोरच्या व्यक्तीचे हावभाव ओळखून ‘स्वतःकडून चूक झाली आहे का ?’, असे विचारते आणि तिचे काही चुकले असल्यास प्रायश्चित घेते.

४. मायेची ओढ अल्प असणे : तिला गाडी-बंगला इत्यादी मायेतील वस्तूंचा लोभ नाही. वर्ष २०१८ मध्ये तिला सध्या असलेल्या वेतनाच्या तिप्पट वेतन अन्य ठिकाणी मिळणार होते; पण सध्याच्या नोकरीच्या ठिकाणी तिला सेवेसाठी अधिक वेळ मिळतो; म्हणून तिने सध्याची नोकरी सोडली नाही.

५. ती एखादी गोष्ट इतरांना शिकवतांना किंवा सांगतांना साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगते.

६. ती मला नामजपाचे महत्त्व सांगून नामजप करायला सांगते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १०.२.२०२२)