काही घंट्यांत पुन्हा अटक
जळगाव – अट्टल दुचाकी चोरास अटक करून आणल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात मध्यरात्री असलेल्या २ पोलिसांना झोप लागल्याचे पाहून चोरट्याने हातकडी काढली आणि पोलीस कोठडीतून पलायन केले. पोलिसांनी काही घंट्यांतच त्याला बर्हाणपूर येथून अटक केली. मनीराम उपाख्य मायाराम जनरलसिंह यादव असे त्याचे नाव आहे. (बेफिकीर पोलीस ! कोठडीतून चोर पळूच कसा शकतो ? त्याच्या पलायनासाठी उत्तरदायी असणार्या २ पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)