श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘साधनेत बुद्धीपेक्षा भावाला महत्त्व आहे’, हे मुख्य मर्म सांगितल्यामुळे मकरसंक्रांत खऱ्या अर्थाने साजरी झाल्याचे जाणवणे

‘१४.१.२०२२ या मकरसंक्रांतीच्या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आश्रमात आल्या होत्या. तेव्हा भोजनाची वेळ असल्याने बरेच साधक भोजनकक्षात होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ साधकांशी बोलत असतांना मला आलेली अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘साधनेत बुद्धीपेक्षा भावाला अधिक महत्त्व आहे’, असे सांगणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तिथे उपस्थित असलेल्या गिरिजयदादांकडे (श्री. गिरिजय प्रभुदेसाई, संगीत विशारद, तबला) पाहून साधकांना म्हणाल्या, ‘‘गिरिजयदादा तबला वाजवत असतांना त्याचा आधी बुद्धीचा वापर होत होता; म्हणून परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्याला आध्यात्मिक स्तरावर तबला वाजवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले.’’ त्यानंतर त्यांनी तसे प्रयत्न केले. त्या संदर्भात ‘गिरिजयदादांना कशी अनुभूती आली ?’ हे सद्गुरु काकूंनी त्यांना साधकांना सांगायला सांगितले. गिरिजयदादांनी ते साधकांना सांगितल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ म्हणाल्या, ‘‘साधनेत बुद्धीपेक्षा भावाला अधिक महत्त्व आहे.’’

१ आ. ‘आपला देह म्हणजे एक मूर्ती असून भावाश्रूंनी तिला अभिषेक करून देहाची शुद्धी करायची आणि देवाने हा देह दिल्याबद्दल त्याच्या चरणी सतत कृतज्ञताभावात रहायचे’, असे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासंबंधी बोलतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू आले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आपण आपल्या देहाला एक मूर्ती समजायचे. जेव्हा आपल्या डोळ्यांतून भावाश्रू वहातात, तेव्हा ते या देहरूपी मूर्तीला अभिषेक घालून शुद्ध करत आहेत’, असा भाव ठेवायचा. हा देह आपल्याला देवाने दिला असून तो पवित्र आहे. आपण स्वतःला न्यून न लेखता त्यासाठी देवाच्या चरणी निरंतर कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपला हा देह घडवण्यासाठी देवाला किती गोष्टींचा विचार करावा लागला असेल; म्हणून आपण देवाने हा देह दिल्याबद्दल देवाच्या चरणी निरंतर कृतज्ञ राहिले पाहिजे.’’

 

२. अनुभूती

कु. नंदिता वर्मा

२ अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील छायाचित्र पहातांना ‘त्यांचे माझ्याकडे लक्ष आहे’, असे वाटणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ भोजनकक्षातील इतर साधकांशी बोलत असतांना अकस्मात् माझा भाव जागृत झाला आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहायला लागले. मी त्यांना म्हणाले, ‘‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तुमचे छायाचित्र पहात असतांना ‘तुम्ही माझ्याकडे बघत आहात, म्हणजे ‘तुमचे माझ्याकडे लक्ष आहे’, असे मला वाटते.’’

२ आ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सहज बोलण्यातून मागील काही दिवस मनात येत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे : मागील काही दिवस माझ्या मनात बुद्धीच्या स्तरावर प्रश्न निर्माण होत होते. त्याविषयी मी माझे दायित्व असलेल्या साधकांशी बोलूनही घेतले; पण श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘बुद्धीपेक्षा भाव महत्त्वाचा आहे’, असे सांगितल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊन मला माझ्या विचारांविषयी पश्चात्ताप वाटला. देवाची क्षमा मागतांना माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊन माझ्या मनाची शुद्धी झाली.

३. कृतज्ञता

‘सद्गुरु आपले मन कसे ओळखतात ?’ आणि ‘त्यांच्या अस्तित्वाने आपली शुद्धी कशी होते ?’, याची अनुभूती मला आली. त्याबद्दल श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! त्यांच्या अस्तित्वाने माझे मन हलके झाले आणि मला सर्व जेवणही गोड लागले. तेव्हा मला वाटले, ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामुळे आज खरी मकरसंक्रांत साजरी झाली !’

– कु. नंदिता वर्मा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक