पंजाबमध्ये अज्ञातांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळल्या

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

भठिंडा (पंजाब) – अज्ञातांनी येथे हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना समजताच हिंदूंकडून संताप व्यक्त केला गेला. ‘दैनिक भास्कर’ने हे वृत्त दिले आहे.

याविषयी माहिती देतांना हिंदु संघटनांचे नेते सुखपाल सरन आणि संदीप अग्रवाल म्हणाले की, काही जणांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळून त्या किला साहिबजवळ टाकल्याची माहिती आम्हाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा  घटनास्थळी पोचला. त्यांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिकांची जळलेली पाने जप्त करून चौकशी चालू केली आहे.’ ’शहरातील वातावरण बिघडवण्यासाठी काही लोकांनी हे कृत्य केले आहे. या प्रकणातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल’, असे आश्‍वासन भठिंडाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे. एलेनचेजियन यांनी दिली.

संपादकीय भूमिका

पंजाबमध्ये गेल्या १-२ वर्षांत घडलेल्या अनेक अनेक हिंदुविरोधी कारवायांत खलिस्तानी आतंकवाद्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. आता तेथे आपचे सरकार आल्यापासून अशा गुन्ह्यांत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे हिंदूंच्या धर्मभावनांना डिचवण्यामागेही खलिस्तानी आतंकवाद्यांचा हात आहे का, याची चौकशी केंद्र सरकारने स्वतःहून केली पाहिजे आणि दोषींना कठोर शासन केले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !