रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या बगलामुखीदेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

तमिळनाडूमधील चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी नाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘बगलामुखीदेवीचा यज्ञ’ झाला. या यज्ञात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी चाफ्याच्या फुलांच्या आहुती दिल्या. बगलामुखीदेवी ही पिवळ्या रंगाशी संबंधित आहे. त्यामुळे तिला पिवळ्या रंगाची चाफ्याची फुले अर्पण करतात. ही देवी आदिशक्तीच्या दशमहाविद्यांपैकी एक देवी आहे. ती गैरसमज आणि संभ्रम दूर करणारी, तसेच ज्ञान देणारी देवी आहे. या यज्ञाच्या वेळी मला पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

श्री बगलामुखीदेवी

१. यज्ञातून प्रक्षेपित झालेली स्पंदने आणि त्यांचा जाणवलेला परिणाम

टीप – तेव्हा यज्ञस्थळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा गंध जाणवून त्यांचे अस्तित्व सूक्ष्मातून जाणवू लागले. त्यामुळे वातावरणात आनंद जाणवू लागला.

अ. एरव्ही वातावरणातील त्रासदायक स्पंदने आणि रज-तम नष्ट करण्यासाठी यज्ञातून शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होतांना जाणवतात; पण बगलामुखीदेवीच्या यज्ञामध्ये त्रासदायक स्पंदने आणि रज-तम आकर्षित होऊन नष्ट होतांना जाणवले.

आ. वातावरणातील त्रासदायक स्पंदने आणि रज-तम नष्ट होत गेल्याने वातावरणातील चैतन्यात वाढ होत गेली.

इ. ज्या वेळी वातावरणातील त्रासदायक स्पंदने आणि रज-तम पूर्णपणे नष्ट झाले, त्या वेळी यज्ञामध्ये त्रासदायक स्पंदने आकर्षित होण्याचे कार्य थांबले आणि यज्ञातून चैतन्याचे प्रक्षेपण होऊ लागले. त्यामुळे तेथील वातावरण प्रकाशमान दिसू लागले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२. प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञात यज्ञकुंडातून चांगली शक्ती प्रक्षेपित होणे, तर बगलामुखीदेवीच्या यज्ञात यज्ञकुंडाकडे वाईट शक्ती आकर्षित होणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या ‘प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञा’तून चांगली शक्ती प्रक्षेपित होतांना जाणवली, तर ‘बगलामुखीदेवीच्या यज्ञा’ कडे वाईट शक्ती आकर्षित होतांना जाणवली. या दोन्ही यज्ञांमध्ये पुढीलप्रमाणे भेद जाणवला.

टीप – भूमीच्या आतील यज्ञकुंडाच्या भूमीच्या वर केलेल्या ३ पायऱ्यांसारख्या आकाराला ‘मेखला’, असे म्हणतात.

यावरून ‘यज्ञासाठी आवाहन केलेल्या देवतेनुसार आणि यज्ञाच्या उद्देशानुसार यज्ञाचे स्वरूप कसे पालटते ? यज्ञातून प्रक्षेपित होणाऱ्या धुराचे महत्त्व, तसेच यज्ञकुंडातून आवश्यक ती स्पंदने आवश्यक त्या वेळी कशी प्रक्षेपित होतात ? हे शिकायला मिळाले.

३. कृतज्ञता

यज्ञाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने या सर्व नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनीच अभ्यास करण्याची दृष्टी दिली आणि तो करवून घेतला, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.१.२०२२)