भारतीय महर्षि कणाद यांनी शेकडो वर्षांपूर्वी अणू आणि ध्वनीची गती यांचा शोध लावलेला असणे !

भारतीय महर्षि कणाद यांनी न्यूटन-डाल्टन यांच्यापूर्वीच ध्वनीची गती आणि अणू यांचा शोध लावला होता. ‘संस्कृतचे कित्येक ग्रंथ आणि रचना अशा आहेत की, ज्या सहस्रो वर्षांपूर्वी लिहिल्या गेल्या आहेत; परंतु आजच्या विज्ञानाच्या कितीतरी अधिक पटींनी ते प्रगत होते. महर्षि कणाद यांची लेखणी आणि त्यापेक्षाही त्यांची वैचारिक क्षमता अत्यधिक प्रगत होती.

ज्या ध्वनीव्यवस्थेवर आज आपणाला गर्व वाटतो, भूमिती शिकतो किंवा अणू आणि अणूकेंद्र (न्यूक्लियर) यांची माहिती ज्यावर आजचे जग गर्व करत आहे, ते सहस्रो वर्षांपूर्वीच आमच्या देशातील संस्कृत विद्वान अन् ऋषिमुनी यांनी जगासमोर मांडले होते. राजे महाराजे यांनी वाईट प्रवृत्ती आणि त्यांच्या कुटीलतेपासून स्वतःला कसे वाचवावे, हेसुद्धा ग्रंथरूपाने लिहून ठेवले आहे.

(साभार : मासिक ‘सावरकर टाइम्स’, ऑक्टोबर २०१७)