‘आपण चारचाकीने प्रवास करायला आरंभ केल्यावर लगेच १०० कि.मी.च्या गतीने जात नाही. ही गती गाठायला थोडा वेळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे ईश्वरी नियोजनाप्रमाणे पृथ्वीच्या दिशेने ‘महायुद्ध’ आणि ‘पंचमहाभूतांचा प्रकोप (नैसर्गिक आपत्ती)’ निघाले आहेत; मात्र त्यांनी अजून गती पकडलेली नाही. काही काळाने ते गती पकडतील आणि संपूर्ण पृथ्वीवर आपल्याला रक्ताच्या नद्या वहातांना दिसतील. मानव समूहाची क्षणात राख होतांना दिसेल. आता होणाऱ्या विश्व महायुद्धाची भयानकता आतापर्यंत कुणीच अनुभवली नसेल.
‘या युद्धात कोण जिवंत रहाणार आणि कोण मृत्यूमुखी पडणार ?’, हे कुणी सांगू शकणार नाही.’
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९६ (३.२.२०२२)