श्रीलंकेत केवळ एक दिवसाचा पेट्रोल साठा शिल्लक !

रानिल विक्रमसिंघे

कोलंबो – आर्थिक डबघाईच्या दिशेने झपाट्याने जात असलेल्या श्रीलंकेत आता केवळ एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोल साठा शिल्लक आहे, अशी माहिती पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिली.

‘देशाची परिस्थिती बिकट आहे. येणारे काही मास कठीण आहेत. प्रत्येकाने त्याग करण्याची आणि आव्हानांना सामोरे जाण्याची सिद्धता ठेवली पाहिजे’, असेही ते म्हणाले.