१. ऋषि शुल्व यांनी यज्ञकुंड कोणत्या मापाची, कुठे आणि कोणत्या दिशेला असावे ? हे सर्व ‘शुल्वसूत्र’मध्ये लिहिलेले असणे
ऋषि शुल्व यांनी लिहिलेला ‘शुल्वसूत्र गणना आणि मापन’ हा ग्रंथ अनोखा अन् वैशिष्ट्यपूर्ण आहे. वास्तविक वेदांमध्ये विविध प्रकारच्या यज्ञांचा उल्लेख आहे उदा. अश्वमेघ, राजसूय इत्यादी. हे यज्ञ करण्यासाठी यज्ञवेदी (यज्ञकुंड) कशी बनवली पाहिजे ? त्याचे माप केवढे असावे ? ते कुठे आणि कोणत्या दिशेला असावे ? हे सर्व ‘शुल्वसूत्र’मध्ये आहे.
२. मापन पद्धतीमध्ये लांबी, रुंदी, खोली, जाडी मापण्याच्या योग्य प्रकारांविषयी ऋषि शुल्व यांनी दुसऱ्या शतकात इसवी सनापूर्वीच सांगितले असणे
या व्यतिरिक्त आज आपण मोजण्यासाठी मीटर, सेंटीमीटर सारख्या मानकांचा वापर करतो; परंतु ऋषि शुल्व यांनी तेव्हाच सांगितले होते की, मापन काय आहे ? लांबी, रुंदी, खोली, जाडी मापण्याचे योग्य प्रकार कोणते आहेत ? हे सर्व ऋषि शुल्व यांनी दुसऱ्या शतकात इसवी सनापूर्वीच (2nd Century BC) लिहिले असल्याचे म्हटले जाते.
(साभार : मासिक ‘सावरकर टाइम्स’, ११-१२ ऑक्टोबर २०१७)