परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. श्री. शंकर जाधव, कुर्डूवाडी

अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सव सोहळ्यात ‘त्यांच्या चरणी वाहिलेली फुले म्हणजे साधकच आहेत. कलियुगातही सर्व साधक आनंदाने रहात आहेत’, असे मला वाटले.

आ. ‘पशू-पक्षी, सजीव आणि निर्जीव या सर्वांच्या कल्याणासाठी गुरुदेवांनी त्यांचे अवतारी कार्य प्रकट करायला चालू केले आहे’, असे मला वाटले.

२. सौ. सुनिता न्यामणे, सोलापूर

२ अ. जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर स्वप्नात ‘राष्ट्रध्वज आकाशात उंच फडकत आहे’, असे दिसणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर त्या रात्री मला अत्यंत आनंददायी स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘भारताचा राष्ट्रध्वज आकाशात उंच फडकत आहे. आकाशातून फुलांचा वर्षाव होत आहे आणि आकाशातून खाली पडत असलेली फुले मी पदरात वेचत आहे.’ त्यानंतर मला जाग आली आणि माझ्या लक्षात आले, ‘सूक्ष्मातून हिंदु राष्ट्र स्थापन झाले आहे. आता स्थुलातूनही ते लवकरच स्थापन होईल.

३. सौ. श्रीदेवी पाटील, सोलापूर

अ. मी जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच आनंदात होते. मला घरी पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गुरुदेवांच्या चरणांवर फुले अर्पण केल्यावर घरात मोगऱ्याचा सुगंध येऊ लागला. हा सुगंध अर्धा घंटा येत होता.

४. श्रीमती सुवर्णा सदाफुले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), भारती विद्यापीठ

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले पालखीत बसले असून पालखीच्या जवळ काही संतांचे दर्शन होणे : सोहळ्याच्या दिवशी गुरुदेवांना शरणागतीने प्रार्थना करतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टर पालखीत बसले आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पालखीला धरले आहे आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ पालखीजवळ उभ्या आहेत. ती पालखी मुख्य प्रवेशद्वारासमोर आली. प.पू. गुरुदेव श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु यांच्या स्वरूपात दाराशी आले. तेव्हा मी त्यांची आरती केली.’

५. श्रीमती आशा दसाडे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), भारती विद्यापीठ

अ. सोहळ्याच्या दिवशी सकाळी मी घराची शुद्धी करून अन्य सेवाही वेळेत केल्या. सोहळा पहातांना ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत आणि मी सोहळा प्रत्यक्ष अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते.

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २५.६.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक