योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या श्री दत्तगुरूंच्या चित्राच्या फ्रेममध्ये १८ मासांनी विभूती निर्माण होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘कल्याण, जिल्हा ठाणे येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये आध्यात्मिक उपाय म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवण्यासाठी फ्रेममध्ये (चौकटीमध्ये) श्री दत्तगुरूंचे चित्र दिले आहे. हे चित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत लावल्यानंतर १८ मासांनी (महिन्यांनी) ४.३.२०१८ या दिवशी त्या चित्राच्या चौकटीच्या मागील (पाठच्या) बाजूला सर्व ठिकाणी पिवळसर पांढरी विभूती आपोआप निर्माण झाल्याचे आढळून आले. ती विभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका डब्यात काढून ठेवली होती. त्यानंतर ८ मार्च २०१८ या दिवशी त्या विभूतीमध्ये ॐ उमटलेला आढळून आला.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

कु. मधुरा भोसले

१. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या श्री दत्तगुरूंच्या चित्राच्या फ्रेमच्या मागे पिवळसर पांढरी विभूती आपोआप निर्माण होण्यामागील कार्यकारणभाव

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेले श्रीदत्ताचे चित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे श्रीदत्तगुरूंचे अवतार होते. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या श्री दत्तगुरूंच्या चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात दत्ततत्त्व आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भक्तीमुळे श्रीदत्तगुरूंच्या चित्रामध्ये त्यांचे तत्त्व कार्यरत झाल्यामुळे ४.३.२०१८ या दिवशी या चित्राच्या चौकटीच्या मागील (पाठच्या) बाजूला सर्व ठिकाणी पिवळसर पांढरी विभूती आपोआप निर्माण झाल्याचे आढळून आले. या विभूतीच्या माध्यमातून श्री दत्तगुरूंनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी त्यांना कृपाशीर्वाद दिला. त्यामुळे वर्ष २०१६ ते २०१८ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्राणांचे रक्षण झाले.

२. विभूतीमध्ये ‘ॐ’ चे शुभचिन्ह उमटण्यामागील कार्यकारणभाव

८ मार्च २०१८ या दिवशी त्या विभूतीमध्ये ॐ उमटलेला आढळून आला.

जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या चित्रामध्ये आपोआप निर्माण झालेली विभूती एका डबीत काढून ठेवली, तेव्हा विभूतीमध्ये कार्यरत झालेल्या दिव्य शक्तीचे रूपांतर धर्मशक्तीमध्ये होऊन त्या विभूतीमध्ये धर्मशक्तीचे प्रतीक असणारे ‘ॐ’ हे शुभ चिन्ह निर्माण झाले. या शुभचिन्हातून पृथ्वीभोवतीच्या वायूमंडलात चैतन्यदायी धर्मशक्तीचे प्रक्षेपण होऊन वायुमंडलाची शुद्धी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणचे हिंदू जागृत झाले आणि ते धर्माचरण अन् साधना करण्यास उद्युक्त झाले.

कृतज्ञता

योगतज्ञ दादाजी यांच्या माध्यमातून श्री दत्तगुरूंनीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शुभाशीर्वाद दिले यासाठी योगतज्ञ दादाजींच्या चरणी कोटी कोटी नमन!’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, (१४.५.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक