पालघर येथे ‘पबजी’ खेळतांना तरुण इमारतीवरून खाली पडला !

पालघर – पबजी खेळतांना एक तरुण इमारतीवरून खाली पडला. ही घटना पालघर जिल्ह्यातील शिरगावमध्ये घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर घायाळ झाला आहे. हा तरुण मित्रांसमवेत बांधकाम चालू असलेल्या इमारतीवर ‘पबजी’ हा खेळ भ्रमणभाषद्वारे खेळत होता; मात्र तो खेळात इतका गुंतला की, त्याला आपण दुसर्‍या माळ्यावर असल्याचाच विसर पडला. (भ्रमणभाषच्या आहारी गेलेली आजची तरुणाई ! – संपादक) खेळता खेळता अचानक तो दुसर्‍या माळ्यावरून खाली पडला.

संपादकीय भूमिका

 ‘पबजी’सारख्या खेळाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! अशा खेळांवर कायमस्वरूपी बंदी आणून त्याची कठोर कार्यवाही झाली पाहिजे !