‘साधकांचा संपर्क त्यांचे नातेवाईक आणि साधक या दोन्हींशी येतो. साधक नातेवाईकांशी मायेतील आणि साधकांची आध्यात्मिक स्तरावरील जीवन जगतो. साधना करत असतांना वैचारिक स्तर मानसिक स्तरावरून आध्यात्मिक स्तराकडे वळतो. त्यामुळे त्याला मायेतील कुटुंबियांकडून मिळणाऱ्या सुखापेक्षा साधना करून आध्यात्मिक स्तरावर रहाण्यातील आनंद मिळतो. त्यामुळे त्याची ओढ कुटुंबियांकडे अल्प प्रमाणात, तर साधकांकडे अधिक प्रमाणात असते. दोन्ही स्तरांवरील नाते अनुभवत असतांना साधकांना पुढीलप्रमाणे भेद जाणवतो.
१. साधकाला नातेवाईक आणि साधक यांच्याशी नाते जोपासत असतांना जाणवलेला भेद
२. साधकांच्या कुटुंबियांनो, साधकांना कुटुंबियांपेक्षा साधक अधिक जवळचे वाटण्यामागील कार्यकारणभाव लक्षात घ्या आणि त्यांना आश्रमात जायला विरोध न करता त्यांचे कौतुक करा !
जेव्हा साधक मायेतील जीवन जगत असतो, तेव्हा त्याला कुटुंबीय महत्त्वाचे वाटतात; परंतु जेव्हा साधकाची साधना चालू होते, तेव्हा त्याच्या आध्यात्मिक जीवनाला आरंभ होतो. त्यामुळे त्याचा वैचारिक स्तर मानसिक स्तरावरून आध्यात्मिक स्तराकडे वळतो. त्यामुळे त्याला मायेतील कुटुंबियांकडून मिळणाऱ्या सुखापेक्षा साधना करून आध्यात्मिक स्तरावर रहाण्यातील आनंद मिळतो. त्यामुळे त्याची ओढ कुटुंबियांकडे अल्प प्रमाणात, तर साधकांकडे अधिक प्रमाणात असते. त्याचप्रमाणे कुटुंबियांशी नाते जोपासतांना त्यांचा अहं जोपासावा लागतो; परंतु साधकांशी असणारे नाते हे अहंविरहित असते. त्यामुळे त्याला कुटुंबियांपेक्षा साधक अधिक जवळचे वाटू लागतात.
यामुळे बऱ्याच साधकांना घरी जाण्याऐवजी आश्रमात रहाण्याची इच्छा असते. ‘कुटुंबियांनो, त्यांना आश्रमात जायला विरोध न करता त्यांचे कौतुक करा.’ ही त्यांची साधनाच होते.
३. साधकांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांना आवडणाऱ्या नात्यांमध्ये होणारे पालट
अ. २० ते ५० टक्के पातळीच्या साधकाला मायेतील नाती महत्त्वाची वाटतात.
आ. ५० ते ६० टक्के पातळीच्या साधकाला मायेतील नात्यापेक्षा साधकांचे आध्यात्मिक स्तरावरील नाते जवळचे वाटल्याने नातेवाइकांपेक्षा साधक जवळचे वाटतात.
इ. ६० टक्के पातळीच्या पुढील साधकांमध्ये शिष्याचे गुण वाढू लागतात. त्यामुळे त्याला ‘गुरु आण शिष्य’ यांचे नाते जवळचे वाटू लागते.
ई. ७० टक्के पातळीच्या पुढील साधकांची (संतांची) ओढ श्रीगुरूंच्या निर्गुण रूपाकडे (ईश्वराकडे) निर्माण झाल्यामुळे संत आणि ईश्वर यांच्यामध्ये ‘भक्त अन् भगवंत’ हे नाते दृढ होऊ लागते.
४. साधकाची आध्यात्मिक पातळी, साधकाचा वैचारिक स्तर आणि साधकाला आवडणारे नाते
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, गोवा. (१४.९.२०२१)
|