ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी ३ लाखांची लाच घेणाऱ्या दलालास ६ मास सक्तमजुरीची शिक्षा !

ठाणे, ११ मे (वार्ता.) – थिनरने भरलेला टँकर सोडवण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने ३ लाख रुपयांची लाच घेणारा दलाल हिंमत उपाख्य हेमराज हिरजी नंदा याला ठाणे सत्र न्यायालयाने ६ मास सक्तमजुरी, तसेच ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. १९ वर्षांनंतर आरोपीला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे संदीप धरमशंकर सिंह यांनी वर्ष २००३ मध्ये यासंदर्भात तक्रार प्रविष्ट केली होती. (उशिराने मिळणारा न्याय नव्हे अन्यायच ! – संपादक)